PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 | पीएम सूर्य घर मोफत वीज योजना |
PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 |
नमस्कार मित्रांनो, आपल्या देशातील नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. त्या योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजना राज्यातील वेगवेगळ्या घटकांसाठी राबवल्या जात असतात.
तसेच आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल घटक, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती – जमाती, कष्टकरी बांधव, शेतकरी, बांधकाम कामगार, आरोग्य सेविका तसेच ज्येष्ठ नागरिक व महिला या सर्वांना या योजनेमध्ये समाविष्ट केले जाते. त्यातून त्यांचा विकास करून त्यांना एक परिपूर्ण जीवन प्रदान करण्याचा प्रयत्न होत असतो.
शासनाकडून नागरिकांच्या कल्याणासाठी या योजना नेहमीच राबवल्या जातात. त्यातून वेगवेगळ्या प्रकारे साह्य दिले जाते. त्यामुळे नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होते.
त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसाठी एका नवीन योजनेची घोषणा केली आहे. ती योजना म्हणजे ” पीएम सूर्य घर मोफत वीज योजना “ होय. या योजनेअंतर्गत 78,000/- हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान आपल्या घरावरती सोलार पॅनल बनवण्यासाठी देण्यात येते. तसेच या पॅनलच्या माध्यमातून प्रत्येक घरासाठी 300 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे .
या योजनेची घोषणा करताना मा.पंतप्रधान यांच्याकडून 2030 पर्यंत प्रत्येक घरासाठी मोफत वीज उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत घरावरती सोलर पॅनल आपणही बसू शकता. तसेच या योजनेंतर्गत अनुदान आपल्यालाही मिळू शकते.
मोफत सूर्य घर योजनेमुळे घरगुती बिलामध्ये मोठी बचत होणार आहे. त्यामुळे नागरिकांवर घरगुती वापराच्या बिलाचा अतिरिक्त जो भार पडत होता, तो या योजनेमुळे कमी होणार आहे. त्यासाठी शासनाने या योजनेअंतर्गत 1 ते 3 किलो वॅटसाठी 40% अनुदान दिले आहे, तसेच 3 किलो ते 10 किलो वॅट पर्यंत २० टक्के अनुदान जाहीर केले आहे.
15 फेब्रुवारी 2024 रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय उर्जेचे महत्त्व पटवून देऊनयांनी, या योजनेची घोषणा केली. देशातील घरांमध्ये अक्षय ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर हा घरगुती स्तरावर वाढावा व देशाच्या ऊर्जा क्षेत्राला बळकटी मिळावी, हा एकमेव उद्देश ठेवून, या योजनेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. या योजनेमुळे देशभरातील एक करोड परिवारांना लाभ मिळेल. तसेच येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये या योजनेमार्फत एक कोटी कुटुंबाना प्रकाश देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण आपल्या लेखांच्या माध्यमातून घेतच असतो. त्या योजनांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहाय्य मिळत असते. त्याचप्रमाणे आज आपण पीएम नरेंद्र मोदी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेला पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची माहिती पाहणार आहोत.
त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरातील लोकांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे आपल्या देशातील प्रत्येक घरात मोफत वीज योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल, ही विनंती.
योजनेचे नाव | पीएम सूर्य घर मोफत वीज योजना |
योजनेची सुरुवात | पीएम नरेंद्र मोदी यांनी केली |
उद्देश | मोफत वीज पुरवठा करणे |
लाभार्थी | देशातील सर्व नागरिक |
लाभ | 300 युनिट वीज मोफत मिळणार |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
हे देखील वाचा –
Good News | शेळी मेंढी पालन योजना 2024 | Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | मराठीमध्ये संपूर्ण माहिती |
Good News | थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 | Thet Karj Yojana Marathi | संपूर्ण माहिती |
Good News | वीरभद्रकाली ताराराणी महिला स्वयंसिद्धी योजना महाराष्ट्र | Mahila Swayam Siddhi Yojana 2024 |
Good News | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 |
कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना |New | Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 | दिव्यांग शेतकऱ्यांसाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध |
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची उद्दिष्ट्ये |
- देशामध्ये प्रत्येक घराघरांमध्ये अक्षय ऊर्जेचे महत्त्व पटवून देणे, या उद्देशाने मोफत वीज योजना सुरू करण्यात आली.
- सर्वसामान्य जनतेला आपल्या दैनंदिन वापरासाठी लागणारी वीज मोफत देऊन, त्यांना आर्थिक सहाय्य करणे, या उद्देशाने पीएम नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली.
- या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे.
- अक्षय ऊर्जेचा वापर केल्याने पर्यावरणाचे संतुलन राखले जाणार आहे.
- वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सिजनचे प्रमाण वाढन्यास मदत होईल.
- या योजनेमुळे देशातील लोकांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
- विज बिल भरण्यासाठी नागरिकांना पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही, तसेच आता कर्जही काढावे लागणार नाही.
- या योजनेमुळे गोरगरीब जनतेचा वीज बिल अभावी वीज खंडित होण्याची समस्या नाहीशी होईल.
- या योजनेमुळे देशातील जनतेच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची वैशिष्ट्ये |
- पी एम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून देशातील घरगुती बिलांमध्ये मोठी बचत होणार आहे.
- आपल्या देशातील घरांमध्ये घरगुती वापरासाठी लागणारी विजेची गरज ओळखून, ती पुरवण्यासाठी या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
- या योजनेअंतर्गत घरावरती सोलार पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
- पी एम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून दरमहा 300m ची वीज मोफत देऊन, एक कोटी घरांना प्रकाश देण्याची उद्दिष्ट या योजनेमार्फत ठेवण्यात आले आहे.
- या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे.
- त्यामुळे अर्जदार हा घरी बसून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतो.
- आपल्या घराच्या वापराच्या वीज वापर क्षमतेनुसार, आपण सोलार पण प्लांट साठी अनुदान घेऊ शकतो, हे या योजनेचे वैशिष्ट्ये आहे.
PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 | मोफत वीज योजनेंतर्गत मिळणारी सबसिडी |
केंद्र शासनामार्फत देशात सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना, या योजनेअंतर्गत दिली जाणारी मोफत वीज हि मुख्य म्हणजे घरगुती वापर या श्रेणीसाठी दिली जाते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम आपणाला आपला घरासाठी येणारे महिन्याभराचे वीज बिल माहित असणे गरजेचे आहे. त्यावरून आपणाला किती क्षमतेचे सोलार पॅनल बसवता येईल, याच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करता येते. ते पुढील प्रमाणे:
- जर आपल्या घराचे एक महिन्याचे वीज वापर 0 ते 150 युनिट असेल, तर आपणाला एक ते दोन KW क्षमतेचे सोलार पॅनल बसवता येते आणि त्यासाठी आपणाला केंद्र शासनाकडून 30 हजार ते 60 हजार पर्यंत सबसिडी मिळते.
- दीडशे ते तीनशे युनिट आपल्या सध्याचे घराचे वीज बिल येत असेल, तर आपणाला दोन ते तीन Kw क्षमतेचे सोलार पॅनल लागू शकते आणि त्यासाठी केंद्र शासनामार्फत मिळणारी सबसिडी 60000 ते 78 हजार पर्यंत आहे.
- जर आपल्या घराचा एक महिन्याचा वीज वापर हा 300 युनिट पेक्षाही जास्त असेल, तर आपणाला 3 Kw क्षमतेचे किंवा त्यापेक्षा मोठे सोलार पॅनल लागू शकते, त्यासाठी आपणाला केंद्र सरकारकडून 78 हजार पर्यंत सबसिडी मिळू शकते.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी सबसिडी मिळण्यासाठीचे टप्पे |
- मोफत सूर्य घर योजना अंतर्गत सबसिडी मिळवण्यासाठी प्रथम तुम्हाला पोर्टलवर नोंदणी करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा व वीज वितरण कंपनी निवडून वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकावा.
- दुसऱ्या टप्प्यात मोबाईल नंबर व ग्राहक क्रमांक टाकून, लॉगिन करून Rooftop सोलर साठी अर्ज करावा.
- तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या फेसीबिलिटी अप्रोवला मंजुरी मिळाल्यानंतर कोणत्याही अधिकृत डीलर कडून प्लांट स्थापित करून घ्या.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्लांट चा तपशील सबमिट करून नीट मीटर साठी अर्ज पाठवा.
- पुढील टप्प्यात नेट मीटर ची DISCOM द्वारे पडताळणी केल्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग साठी प्रमाणपत्र तयार करण्यात येईल.
- शेवटच्या टप्प्यात पोर्टलवरून बँक डिटेल्स, कमिशनिंग माहिती सबमिट केल्यानंतर 30 दिवसाच्या आत सबसिडी तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 | सरकारकडून खर्च करण्यात येणारी रक्कम |
आपल्या देशात राबविण्यात येणाऱ्या पीएम सूर्य घर मोफत वीज योजने अंतर्गत देशातील एक कोटी लोकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या लोकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवायचे आहेत, त्यांच्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. या संपूर्ण प्रकल्पांतर्गत सरकार एकूण 75,021 कोटी रुपये खर्च करणार आहे.
PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 | मोफत वीज योजनेचे लाभार्थी |
भारत देशातील सर्व जाती, धर्माचे तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब,मागास व दारिद्र्य रेषेखालील नागरिक या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी आवश्यक पात्रता |
- प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेचा अर्जदार हा भारत देशाचा मूळ रहिवासी नागरिक असावा.
- या योजनेच्या अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल,मागास व दारिद्र रेषेखालील कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे.
- पीएम सूर्य घर मोफत योजनेसाठी देशातील सर्व जाती धर्मातील नागरीक पात्र आहेत.
- या योजनेच्या अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असावे.
- या अर्जदाराच्या नावावर त्याचे स्वतःचे विज बिल येत असावे.
- या योजनेच्या अर्जदाराच्या कुटुंबांमधील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरी असू नये.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेचे फायदे |
- मोफत सूर्यवर वीज योजनेमुळे नागरिकांवर येणाऱ्या अतिरिक्त वीज बिलाचा भार कमी होईल.
- या योजनेमुळे अक्षय ऊर्जेचा पर्याय लोकांना अगदी कमी खर्चात आपल्या घरावरती उपलब्ध होईल.
- या योजनेमुळे विज बिल कमी होईलच, त्याचबरोबर देशात नवीन रोजगार निर्मिती चालना मिळेल.
- पंतप्रधान मोफत सूर्य घर योजनेमुळे ग्राहकांना प्रति महिना 300 युनिट वीज मोफत मिळेल.
- त्याचबरोबर या योजनेमुळे देशातील एक करोड जनतेची घरे प्रकाशित होतील.
- या योजनेच्या माध्यमातून रोखठोक सोलार विकत घेऊन, आपल्या घरावर बसवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या रकमेवर सबसिडी देण्यात येते.
- तसेच बँक लोन व सबसिडी मिळाल्याने नागरिकांवर कोणताही आर्थिक बोजा येत नाही.
- मोफत सूर्य घर वीज योजनेमुळे देशात हरितक्रांती घडून देश ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल.
- या योजनेमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल.
- मोफत सूर्य घर वीज योजनेमुळे वीज बचत होईल, त्यामुळे देश उर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनेल.
PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 | मोफत सूर्य घर वीज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- विज बिल
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 | मोफत वीज योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया |
- मोफत वीज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपणाला भारत सरकारच्या अधिकृत website वर जावे लागेल.
- या सरकारच्या वेबसाईट वरील मुखपृष्ठ page open होईल.
- त्या page वरील या बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर दिलेली रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावे.
- त्यानंतर या योजनेच्या अर्ज ओपन होईल.
- त्यानंतर आपला जिल्हा निवडावा.
- नंतर आपला डिव्हिजन निवडावे.
- त्या अर्जामध्ये विचारलेल्या सर्व गोष्टी मोबाईल नंबर ईमेल आयडी व महत्त्वाच्या बाबी अचूक भराव्यात.
- त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे.
- नंतर सोलर साठी अप्लाय करा.
- मान्यता मिळाल्यानंतर प्राप्त झालेल्या साइटवर दिल्या गेलेल्या अधिकृत सोलार डीलर कडून तुमचा सोलर प्लांट लावून घ्या.
- यानंतर तुमचं प्लांट डिटेल सबमिट करा आणि नेट मीटर साठी अप्लाय करा.
- नेट मीटर बसवले गेले की तुमची कमिशन प्रमाणपत्र पोर्टल वरून घेऊ शकता.
- या योजनेच्या कमिशन प्रमाणपत्र चा रिपोर्ट मिळाला की तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स रिपोर्ट पोर्टलवर सबमिट करावे लागतील.
- त्यानंतर 30 दिवसाच्या आत तुमची सबसिडी बँक खात्यात जमा करण्यात येईल.
PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 |
पंतप्रधान मोफत सूर्य घर योजना शासनाची अधिकृत website click here