Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना मराठी |
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 |
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील गोरगरीब जनतेच्या विकासासाठी तसेच कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. या योजना जनतेच्या कल्याणासाठीच शासनामार्फत राबविल्या जात असतात.
राज्य शासनामार्फत तसेच केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या योजना मागे राज्यातील गोरगरीब जनतेचा सामाजिक व आर्थिक विकास करणे, हाच उद्देश असतो. यामध्ये अनुसूचित जाती – जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, इ. मागास प्रवर्ग आणि नवबौद्ध प्रवर्गाच्या नागरिकांचा समावेश असतो.
महाराष्ट्राच्या या नव बौद्ध बांधवांसाठी तसेच इतर जातीच्या जमातीतील लोकांसाठी एका महत्वपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ती योजना म्हणजे ” मोटार वाहन प्रशिक्षण योजना होय. “
महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात बेरोजगाराची प्रमाण कमी करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
तसेच राज्यात वाढत जाणारी लोकसंख्या, त्यामुळे वाहनांचे वाढते प्रमाण तसेच लोकांचा पर्यटन क्षेत्राकडे वाढणारा कल, या सर्व गोष्टी लक्षात घेता वाहन चालक व्यवसायांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
त्यामुळे अशा गरीब कुटुंबातील तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण देऊन बेकारीचे प्रमाण कमी करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने, या योजनेची सुरुवात करण्यात आली.
या समाजातील युवकांना प्रशिक्षण घेण्यासाठी पैशाची आवश्यकता असते व ते पैसे नसल्याने ते प्रशिक्षण घेऊ शकत नाहीत तसेच त्यांचा विकास होण्यास अडथळा निर्माण होतो. हे सर्व लक्षात घेऊन या नवबौद्ध युवकांचा विकास सामाजिक आर्थिक विकास करून त्यांचा जीवनमानाचा स्तर उंचावण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली.
या योजने अंतर्गत तरुणांना खाजगी प्रशिक्षण संस्थेमध्ये वाहन चालकाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी कसल्याही प्रकारचे विध्यावेतन घेतले जात नाही. तसेच प्रशिक्षणार्थीना 40 दिवसाचे प्रशिक्षण पुरवले जाते.
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, राज्य शासनामार्फत तसेच केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण अनुसूचित जाती – जमाती, मागास प्रवर्ग, नवबौद्ध घटकातील तरुणांसाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेला मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेची माहिती आज आपण पाहणार आहोत.
त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा तसेच तुमच्या परिसरात जर कोणी या घटकातील तरुण राहत असतील व ते रोजगाराच्या शोधात असतील, तर त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त गरजू तरुणांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे त्यांनाही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येईल व ते स्वतःच्या पायावर उभे राहतील, ही विनंती.
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 |
योजनेचे नाव | मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र राज्य |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
लाभार्थी | नवबौद्ध प्रवर्गातील तरुण |
लाभ | मोफत मोटार वाहन चालक प्रशिक्षण |
उद्देश | रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे |
अर्ज करण्याची पध्दत | ऑफलाईन |
हे देखील वाचा –
Good News | Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र | 20,000/- रुपयांची आर्थिक मदत |
New |पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र | Good News | Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 |मिळणार 50% अनुदान |
New | ई- श्रम कार्ड पेन्शन योजना मराठी | Good News | E Shram Card Pension Yojana 2024 | मिळणार 2 लाखाचे विमा संरक्षण |
महिला सन्मान योजना महाराष्ट्र | Good News | Mahila Samman Yojana In Marathi 2024 | ST प्रवासात 50 % सूट |
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना मराठीची उद्दिष्ट्ये |
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती – जमातीच्या नवबौद्ध तरुणांना मोफत मोटार वाहन प्रशिक्षणाचा अवलंब करणे.
- चालक प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील या तरुणांना व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
- मोटर वाहन प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या तसेच नवा बौद्ध तरुणांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- राज्यात मोटर वाहनांच्या प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून रोजगारांच्या संदेश उपलब्ध झाल्याने राज्यातील बेकारीचे बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.
- मोटार वाहन प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुनाचे आत्महत्यांचे प्रमाण कमी करून त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे.
- तसेच या योजनेच्या माध्यमातून अर्धवट शिकले शिक्षण सोडलेल्या व कमी शिक्षण झालेल्या तरुणांना प्रशिक्षण दिले जाते. सोडलेल्या तरुणांना नोकरी मिळतील.
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेची वैशिष्ट्ये |
- राज्यात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत या मोटार वाहन प्रशिक्षण योजनेची सुरुवात करण्यात आली.
- राज्यातील अनुसूचित जातीचा जमातीच्या तसेच नवबौद्ध घटकावरील तरुण स्वावलंबी व स्वतंत्र होऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.
- मोटर वाहन चालक प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षण नियुक्ती तरुणांकडून कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण शुल्क आकारले जात नाही.
- मोटर बंद प्रशिक्षण योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन ठेवण्यात आली आहे.
- राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षणाविषयी कार्यक्रमाच्य आयोजन केले जाते.
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | मोटार वाहन प्रशिक्षण योजनेचे पत्र लाभार्थी कोण |
महाराष्ट्र शासना मार्फत राज्यात सुरु करण्यात आलेल्या मोटार वाहन प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी पुढीलप्रमाणे दिलेले आहेत :
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- नवबौद्ध प्रवर्ग
- इतर मागास प्रवर्ग
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | मोटार वाहन प्रशिक्षण योजनेचे फायदे |
- मोफत वाहन चालक प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती -जमाती, इतर मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या गरीब प्रवर्गातील तरुणांना या योजनेच्या माध्यामातू प्रशिक्षण देण्यात येते.
- मोटार वाहन प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाभार्थ्याला प्रशिक्षणासाठी कोणतेही प्रशिक्षण शुल्क भरावे लागत नाही.
- अर्जदाराचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यास प्रादेशिक वाहन कार्यालयामध्ये परीक्षा घेऊनच वाहन चालवण्याचा परवाना प्राप्त होतो.
- या योजनेमुळे राज्यात वाढत जाणारी वाहतूक व्यवस्था आणि त्यामुळे पर्यटन क्षेत्राकडे लोकांचा वाढलेला काल, यामुळे या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी तरुणांना मिळतील.
- मोटार वाहन प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणानाचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यास मदत होईल.
- मोटर वाहन प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेकारचे बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन रोजगार मिळाल्यानंतर आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल.
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेच्या लाभाचे स्वरूप |
- महाराष्ट्र शासन मार्फत मोटार चालक प्रशिक्षण योजना अंतर्गत खाजगी स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात येते.
- या योजनेच्या प्रशिक्षण सत्रामध्ये कमीत कमी 50 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते.
- योजने अंतर्गत लाभार्थ्याची प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्या व्यक्तीस प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत परीक्षा घेऊनवाहन चालवण्याचा परवाना देण्यात येतो.
- या योजनेअंतर्गत लाभार्थी तरुणाला परवाना तसेच बॅच मिळाल्यानंतर शासनाने नेमणूक केलेली शुल्काचे परिपूर्ती प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस केली जाते.
या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांवर शासनाचे लक्ष असते - या प्रशिक्षणामुळे योजनेच्या संपूर्ण कालावधीमध्ये उमेदवाराला कार्य प्रशिक्षण केंद्र पर्यंत जाण्याचे व येण्याचे भाडे,, आरोग्य तपासणी छायाचित्र, चालकाचा कच्चा व पक्का परवाना बिल्ला, राहण्याची, खाण्याची व्यवस्था इत्यादी सर्व या संस्थेमार्फत केले जाते.
- प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या स्थानिक प्रशिक्षणार्थी उपस्थित राहत नसेल, तर त्या चालक प्रशिक्षणार्थ तीनशे रुपये व वाहकास दोनशे याप्रमाणे विद्या वेतन विद्यालय संस्थेकडून प्राप्त केले जाते.
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | मोटार वाहन प्रशिक्षण योजनेसाठी पात्रता |
- मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घ्येणारे उमेदवार महाराष्ट्राचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- हा प्रशिक्षणार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व मागास प्रवर्ग अथवा नमो बुद्धाघटकातील असावा.
- या योजनेअंतर्गत हलके वाहन चालवण्याच्या परवाना करता वय वर्ष 18 पूर्ण, तर जड वाहनाच्या परवाना करता वय वर्ष 20 पूर्ण असल्यास प्रवेश दिला जाईल.
- मोटर वाहन चालक प्रशिक्षण योजने अंतर्गत अर्जदाराची कमाल वयोमर्यादा ही 35 असावी.
- या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या अर्जदार किमान आठवी उत्तीर्ण व बेरोजगार असावा.
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेचे नियम व आटी |
- मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुणांना देण्यात येईल.
- मोटार वाहन प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणातील उमेदवार हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
- ज्या तरुणास जड वाहनाचा परवाना हवा आहे, त्याच्याकडे पूर्वी हलके वाहन चालवण्याचे एक वर्षापूर्वीचा परवाना आवश्यक आहे.
- मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षण घेणाऱ्या अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
- या योजनेअंतर्गत हलके वाहन चालवण्यासाठी दहा टक्के महिला जागा आरक्षित असतील.
- या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यास कोणतेही अपंगत्व नसावे, तसेच कर्णदोष व दृष्टीदोष नसावा तरच प्रवेश दिला जाईल.
- मोटर वाहन प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्याकडे शारीरिक व वयक्तिक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना पूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेंतर्गत आदेश मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण सुरू करणे गरजेचे आहे, अन्यथा दंडाची रक्कम दहा हजार रुपये आकारण्यात येते.
- या योजने अंतर्गत सर्व अधिकार आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्द आहेत.
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | मोटार वाहन प्रशिक्षण योजनेचे आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- शिक्षण प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र पासपोर्ट फोटो ईमेल आयडी मोबाईल नंबर
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | मोटार प्रशिक्षण योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची करणे |
- मोटर वाहन प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज करणारी व्यक्ती ही जर महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी नसेल, तर त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न जर अडीच लाखांपेक्षा जास्त असेल, तर त्या व्यक्तीचा या योजनेतून अर्ज रद्द केला जातो.
- मोटार वाहन प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्जदार शारीरिक दृष्ट्या विकलांग असेल, तसेच त्याला दृष्टीदोषी या कर्णदोष असेल, तर त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जातो.
- या योजनेअंतर्गत अर्ज करणारी व्यक्ती ही जर अनुसूचित जाती – जमाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील नसेल, तर त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जातो.
- मोटर वाहन चालक प्रशिक्षण योजनेतील अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी किंवा 35 पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जातो.
- मोठा प्रशिक्षण योजनेमध्ये एकाच व्यक्तीने दोन वेळा अर्ज केल्या केल्यास त्या व्यक्तीचा अर्ज रद्द होऊ शकतो.
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | मोटार वाहन प्रशिक्षण योजने अंतर्गत अर्ज करण्याची पध्दत |
- मोटार वाहन प्रशिक्षण योजनेचे लाभ घेण्यासाठी जवळच्या जिल्हा समाजकल्याण कार्यालयातील समाज कल्याण विभागात जाऊन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक व योग्य भरावी.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
- त्यानंतर तो अर्ज समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे जमा करावा.
- जमा केलेल्या अर्जाची पोच पावती घ्यावी.
- त्यानंतर अर्ज व कागदपत्राची पडताळणी करून प्रशिक्षणाबाबत कळवतील व योजनेचा लाभ मिळेल.
Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 |
मोफत मोटार वाहन प्रशिक्षण योजना form click here
2 thoughts on “मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना मराठी | Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | Good News | बहुजन समाजातील तरुणांना मिळणार लाभ |”