Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra | Good News | माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी | पहा सर्व माहिती |

Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra | माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी |

Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra
Maha Govt Scheme
Suknya samruddhi Yojana
Bhagyashree Yojana Marathi
Mulinsathichi Yojana Maharashtra

Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra

नमस्कार मित्रानो, शासनामार्फत मुलींच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जात असतात. केंद्र व राज्य सरकार मार्फत या योजना राबविल्या जात असतात. राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिदर्या रेषेखालील जीवन जगात असतात. त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरतात. त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अनेक अडचणी येत असतात.

त्यामुळे ते आपल्या मुलीना शिक्षण देत नाहीत. तसेच त्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्षित केले जाते. तसेच आपल्या राज्यात आशा कुटुंबामध्ये स्त्री भ्रूणहत्येचे  प्रमाणही जास्त आहे. या कुटुंबांमध्ये मुलीनाचा जन्मदर खूप कमी आहे. या पालकांना मुलगी जन्माला घालणे म्हणजे भार वाटतो.तसेच मुलीना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येते.

राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य या मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, शासनाकडून अर्थीक  तरतूद करण्यासाठी, भ्रुणहत्या रोखण्यासाठी आणि राज्यातील मुलींचा जन्म दर वाढविण्यासाठी यासाठी शासन स्तरावर ” माझी कन्या भाग्यश्री योजना ”  या योजनेची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना एप्रिल 2016 मध्ये सुरु केली. राज्यात मुलींचा जन्मदर वाढवून त्यांचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजने अंतर्गत ज्या पालकांनी दोन मुलींच्या जन्म नंतर कुटुंब शस्त्रक्रिया केली असेल आशाच कुटुंबाना या योजनेचा लाभ दिला जातो. राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या मुली वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेवू शकतात.

 

Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra | वाचकांना नम्र विनंती |

मित्रानो, आतापर्यंत केंद्र व राज्य शासनामार्फत राबविलेल्या वेगवेगळ्या योजनाची माहिती आपण घेतली आहे. त्याचप्रमाणे आज आपण महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात गरीब कुटुंबात मुली असतील तर त्यानाही या योजनेची माहिती द्या. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. हि विनंती. Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra

योजनेचे नावमाझी कन्या भाग्यश्री योजना
योजनेची सुरुवातएप्रिल 2016 महाराष्ट्र
योजनेचा विभागबाल विकास विभाग, महाराष्ट्र
लाभार्थीदारिद्र्य कुटुंबातील मुली
लाभ50,000/- रुपये
उद्देशमुलीना आर्थिक दृष्ट्या बळकट करणे
अर्ज करण्याची पध्दतऑफलाईन

 

हे पण वाचा –

                           NEW | Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | राजीव गांधी विध्यार्थी अपघात विमा योजना 2024 |

 

                            Khavati Anudan Yojana Maharashtra | New | खावटी अनुदान योजना 2024 | नव्या स्वरुपात |

माझी कन्या भाग्यश्री योजन मराठी चे उद्दिष्ट्ये |

  • माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवणे, तसेच त्यांचे भविष्य उज्वल करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेअंतर्गत बालविवाह प्रतिबंध करून मुलींना त्यांच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता योजनेची सुरुवात झाली.
  • या योजनेच्या साहाय्य तून मुलींना आरोग्याच्या सुख सुविधा पुरविणे.
  • या योजनेच्या माध्यमातून मुलींना बालविवाहस प्रतिबंध करण्यास सक्षम करणे.
  • माझी कन्या भाग्यश्री योजनेचा उद्देश म्हणजे स्त्रीभ्रूणहत्या कमी करून राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील मुला-मुलींमध्ये असणारी विषमता दूर करणे.
  • या योजने अंतर्गत राज्यातील मुलींना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा प्रदान करणे.Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra
  • माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत राज्यातील मुलींच्या आरोग्याच्या असणाऱ्या समस्या सोडविणे.
  • मुलींबद्दल समाजात असणाऱ्या गैरसमजुती नष्ट करणे, हा या भाग्यश्री योजनेचा उद्देश आहे.

 

माझी कन्या भाग्यश्री योजन मराठी चे वैशिष्ट्ये |

  • माझी कन्या भाग्यश्री योजना राज्यातील मुलींसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
  • या योजनेअंतर्गत मुलींचा जन्मदर वाढवणे, शिक्षणात सहाय्य करणे, आरोग्याच्या सोयी पुरवने, स्त्री भ्रूणहत्या बंद करणे व  बालविवाहास प्रतिबंध करणे या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
  • माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत राज्यातील योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य पुरविले जाते.
  • या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य डीबीटी ( DBT ) मार्फत थेट मुलींच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.
  • माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे.Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुलींच्या पालकांना कोणत्याही सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही.

 

माझी कन्या भाग्यश्री योजन मराठी चे लाभार्थी |

माझी कन्या भाग्यश्री योजना या योजने अंतर्गत मिळणारा लाभ हा दोन प्रकारच्या लाभार्थ्यांना दिला जातो, ते पुढीलप्रमाणे :

प्रकार 1ज्या पालकांनी एका मुलीच्या जन्मानंतर आपली कुटुंबनियोजन नसबंदी करून घेतली आहे. या कुटुंबातील मुलगी या योजनेचा लाभ घेवू शकते.
प्रकार 2दोन मुली झाल्यानंतर म्हणजे दुसर्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्याच्या आत नसबंदी करून घेतल्यास या दोन्ही मुलीना या योजनेचा लाभ मिळतो, मात्र एक मुलगा व एक मुलगी असेल तर या योजनेच अलभ मिळणार नाही.

 

माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी या योजने अंतर्गत दिला जाणारा लाभ हा विविध टप्प्यांमध्ये दिला जातो, ते टप्पे पुढीलप्रमाणे : 

टप्पा 1 : मुलीच्या जन्माच्या वेळी 

लाभ : पहिल्या मुलीसाठी 5,000/- रुपये

दुसऱ्या मुलीसाठी 2,500/- रुपये

टप्पा 2 : मुलगी 5 वर्षाची होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी 

दोन्ही मुलीना प्रती वर्षी 2,000/- रुपये प्रमाणे 5 वर्षाकरता 10,000/- रुपये

टप्पा 3 : प्राथमिक शाळेत प्रवेश ( इयत्ता 1 ली ते 5 वी )

दोन्ही मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी 1,500/- रुपयांप्रमाणे 5 वर्षांकरिता प्रत्येकी 15,000/- रुपये

टप्पा 4 : माध्यमिक व उच्च माध्यमिक ( इयत्ता 6 वी ते 12 वी )

दोन्ही मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी 2,000/- रुपयांप्रमाणे 7 वर्षांकरिता प्रत्येकी 22,000/- रुपये

टप्पा 5 : वयाच्या 18 व्या वर्षी 

या योजने अंतर्गत भरलेल्या विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपये देण्यात येतील. त्यापैकी किमान 10,000/- रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे आवश्यक आहे.Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra

माझी कन्या भाग्यश्री योजन मराठी या योजनेची पात्रता |

  1. माझी कन्या भाग्यश्री योजने साठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा.
  2. या योजनेतील अर्जदार व्यक्ती हि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असावी.
  3. 2017 नंतर जन्मलेल्या मुळीच या योजनेसाठी पत्र असतील.

 

माझी कन्या भाग्यश्री योजन मराठी चे नियम व आटी |

  •  माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र अर्ज सोबत दाखल करावे.
  • या योजनेअंतर्गत लाभ फक्त मुलींनाच दिला जाईल एक किंवा जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ एक ऑगस्ट 2017 नंतर व त्या दिवशी जन्मलेल्या मुलींना दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ 2017 पूर्वी जन्मलेल्या मुलींना दिला जाणार नाही.
  •  जर एखाद्या पालकांना पहिला मुलगा व दुसरी मुलगी असेल किंवा पहिली मुलगी व दुसरा मुलगा असेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेअंतर्गत एखाद्या पालकाला जर पहिल्या दोन मुली असतील व तिसरी ही मुलगी असेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही याउलट पहिल्या दोन मुलींना मिळणारा लाभ ही रद्द केला जाईल.
  •  या योजनेचे लाभ कुटुंबातील फक्त दोनच मुलींना दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख असणे आवश्यक आहे.
  • दुसऱ्या प्रसूतीवेळी मातेने जर जुळ्या मुलींना जन्म दिला तर या दोन्ही मुले योजनेस पात्र असतील.
  • योजनेअंतर्गत दिली जाणारी मुदत ठेव रक्कम ही मुलगी च्या 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काढता येईल.
  • त्यावेळेस मुलगी ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ती मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे.
  • बालगृहातील अनाथ मुलींना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • जर एखाद्या पालकांनी मुलगी दत्तक घेतलेली असेल तर त्या मुलीलाही या योजनेचा लाभ मिळू शकेल, पण त्या पालकांना या योजनेचे सर्व नियम अटी लागू असतील लागू असतील.Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra
  • या योजनेअंतर्गत मुदतीपूर्वी म्हणजेच मुलीचे अठरा वर्ष पूर्ण होण्या अगोदर जर लग्न झाले किंवा काही कारणाने तिचे शाळेतून नाव काढण्यात आले तर ते या योजनेस पात्र असणार नाही.
  •  या योजनेमध्ये अर्ज करतेवेळी मुलीचे जन्म प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

 

माझी कन्या भाग्यश्री योजन मराठी या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी या योजनेचा अर्ज click Here

माझी कन्या भाग्यश्री या योजनेबद्दल संपूर्ण माहिती click here

 

  1.  मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र [ शाळेचा दाखला किंवा जन्माचा दाखला ]
  2. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर जर योजनेसाठी अर्ज केला असेल तर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  3. तसेच दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर अर्ज करण्यासाठी सहा महिन्याच्या आत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
  4.  आधार कार्ड
  5. सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
  6. रेशन कार्ड
  7. उत्पन्नाचा दाखला
  8. पासपोर्ट साईज फोटो
  9. ईमेल आयडी
  10. रहिवाशी दाखला Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra

 

माझी कन्या भाग्यश्री योजन मराठी अंतर्गत अर्ज रद्द होण्याची करणे |

  • माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द होतो.
  • योजनेतील अर्जदार कुटुंबाने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केलेली नसल्यास या योजनेतून अर्ज रद्द केला जातो.
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी मुलीचा जन्म ऑगस्ट 2017 पूर्वी झालेला असल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • कुटुंबातील दुसऱ्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • कुटुंबातील पालकांचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख पेक्षा जास्त असल्यास या योजनेचा अर्ज रद्द केला जातो.

 

Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra | अर्ज करण्याची  पध्दत |

  • प्रथम अर्जदाराला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज download करावा लागेल.
  • नंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे कि, नाव, पत्ता, जन्म तारीख इत्यादी भरावी.
  • तसेच सर्व आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत या अर्ज सोबत जोडाव्यात.
  • नंतर तो अर्ज जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावा.
  • अशाप्रकारे तुमची या योजनेमधील नोंदणी पूर्ण होईल. Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra

 

 

 

 

 

2 thoughts on “Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra | Good News | माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी | पहा सर्व माहिती |”

Leave a Comment